२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक ही दहावी आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धा होती. सदर स्पर्धा ही पुरुषांच्या राष्ट्रीय संघांद्वारे खेळली जाणारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा होती. फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत स्पर्धेचे आयोजन श्रीलंका आणि भारताकडून केले गेले.
मागील आवृत्तीप्रमाणे या स्पर्धेत सुद्धा २० संघ सहभागी झाले. दोन यजमान राष्ट्रे आणि मागील आवृत्तीतील अव्वल आठ संघ, आयसीसी पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी पुढील दोन संघांसह आपोआप स्पर्धेसाठी पात्र ठरले. उर्वरित आठ संघ प्रादेशिक पात्रता प्रक्रियेद्वारे निश्चित केले गेले. भारत गतविजेता होता. इटलीने पहिल्यांदाच पुरुषांच्या टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.
भारताने अंतिम सामन्यात न्यू झीलंडला ९६ धावांनी हरवून आपले जेतेपद राखले. घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक जिंकणारा तो पहिला यजमान संघ आणि तीन वेळा टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.
२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!