२०२२ मध्य युरोप चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा आहे ८ ते १० जुलै २०२२ दरम्यान चेक प्रजासत्ताक देशातील प्राग येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताकसह ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्ग या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. मध्य युरोप चषक स्पर्धेची ही आठवी आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असलेली दुसरी आवृत्ती होती. सर्व सामने प्राग मधील विनॉर क्रिकेट स्टेडियमवर खेळविले गेले. ऑस्ट्रियाने मागील आवृत्ती जिंकली होती.
ऑस्ट्रिया आणि चेक प्रजासत्ताक या दोन्ही देशांनी प्रत्येकी ३ सामने जिंकत १२ गुण मिळवले, त्यामुळे विजेतेपदासाठी निव्वळ धावगतीचा निकष लावण्यात आला. यजमान चेक प्रजासत्ताकची धावगती ऑस्ट्रियापेक्षा जास्त असल्याने त्यांना मध्य युरोप चषकाचे विजेते घोषित करण्यात आले. लक्झेंबर्गला एकही सामन्यामध्ये विजय मिळवता आला नाही.
२०२२ मध्य युरोप चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?