२०२२ व्हॅलेटा चषक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२०२२ वॅल्लेटा चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १० ते १५ मे २०२२ दरम्यान माल्टामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने मार्सा मधील मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात आले. यजमान माल्टासह बल्गेरिया, जिब्राल्टर, चेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि रोमेनिया या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे सद्य विजेते माल्टा आहे. माल्टाने २०२१ च्या आवृत्तीमध्ये स्वित्झर्लंडचाचा अंतिम सामन्यात पराभव करून चषक जिंकला होता.

प्रत्येक संघाने इतर सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळला. पहिले चार सामने जिंकत माल्टाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोमेनियाने माल्टाचा ९ धावांनी पराभव करून चषक जिंकला. तर ३ऱ्या आणि ५व्या स्थानासाठी झालेल्या प्ले-ऑफ सामन्यामध्ये अनुक्रमे चेक प्रजासत्ताक आणि बल्गेरिया यांनी विजय मिळवला. रोमेनियाच्या तरणजीत सिंगला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →