२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.
मागील विश्वचषकसाठी युरोपातील उपप्रादेशिक स्पर्धा कोव्हिड-१९ मुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे केवळ चार संघांनाच प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये ट्वेंटी२० क्रमवारीच्या आधारे प्रवेश मिळाला. जर्सी आणि जर्मनीने पुढील फेरीसाठी बढती मिळवल्यामुळे २०२४ विश्वचषकासाठी त्यांना थेट प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यावेळेस युरोप खंडातील एकूण २८ देश उपप्रादेशिक स्पर्धांमध्ये भाग घेतील. उपप्रादेशिक स्पर्धा तीन स्पर्धांमध्ये झाली. गट क चे सामने बेल्जियम मध्ये आणि गट अ, ब चे सामने फिनलंडमध्ये झाले. प्रत्येक गटाचा विजेता संघ प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये पात्र ठरला.
२०२२-२३ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.