२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा ही आशिया क्रिकेट संघटनद्वारे अयोजीत केलेली महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १७-२५ जून २०२२ दरम्यान मलेशियामध्ये झाली. सदर स्पर्धा डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशात झालेल्या २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा होती. अव्वल दोन संघ मुख्य आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. क्वालालंपूर मधील किन्रर अकॅडेमी ओव्हल मैदानावर खेळवले गेलेले हे शेवटचे क्रिकेट सामने होते. ३० जून २०२२ रोजी सदर मैदान पाडण्यात आले.
यजमान मलेशियासह बहरैन, भूतान, हाँग काँग, कुवेत, नेपाळ, ओमान, कतार, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांनी स्पर्धेत भाग घेतला. १० संघांना पाचच्या दोन गटात ठेवण्यात आले. गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आणि उपांत्य सामन्यांचे विजेते थेट आशिया चषकास पात्र ठरले. तरीसुद्धा स्पर्धेचा विजेता ठरविण्यासाठी उपांत्य सामन्यांच्या विजेत्यांमध्ये जेतेपदासाठी अंतिम सामना खेळविण्यात आला. उपांत्य फेरीतून मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती अंतिम सामन्यासाठी आणि परिणामतः २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने मलेशियाचा ५ गडी राखून पराभव करत अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.