२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २० ते २६ मार्च २०२२ दरम्यान ओमानमध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा आखाती सहकार परिषदेने भरविली होती. यजमान ओमानसह बहरैन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांतील सहा देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. पैकी बहरैन आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२२ मार्च २०२२ रोजी बहरैनने सौदी अरेबियाविरुद्ध पहिली फलंदाजी करत ३१८ धावा नोंदवल्या. महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. बहरैनची दीपिका रसंगिका एका महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये १५० पेक्षा धावा करणारी पहिली खेळाडू ठरली. संयुक्त अरब अमिरातीने सर्व पाच सामने जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.