२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ९-१९ सप्टेंबर २०२१ दरम्यान बोत्स्वानामध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या आफ्रिका भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण अकरा देशांनी यात भाग घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार होते परंतु एक महिना आधी स्पर्धा खेळविण्याचे निश्चित करण्यात आले. बोत्स्वाना, कामेरून आणि मलावी हे तीन देश आयसीसी स्पर्धांमध्ये पदार्पण करणार होते. परंतु स्पर्धा सुरू होण्याच्या आधी मलावीने माघार घेतली. त्यांच्याजागी इस्वाटिनीने स्पर्धेत सहभाग घेतला.

११ देशांना ६ आणि ५ अश्या दोन गटांमध्ये विभागले गेले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरले. स्पर्धेचा विजेता संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला. अ गटामधून झिम्बाब्वे आणि टांझानिया तर ब गटामधून नामिबिया आणि युगांडा हे चार देश उपांत्य फेरी मध्ये गेले. पहिल्या उपांत्य सामन्यात झिम्बाब्वेने युगांडाला १४ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात नामिबियावर १३ धावांनी विजय मिळवत झिम्बाब्वे संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला. तर अपात्र (म्हणजेच स्थानिक पात्रता फेरीत) दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या क्रमवारीत उच्च स्थानावरच्या संघासाठीच्या शिल्ल्क जागेतून पुढील पात्रता फेरीस जाण्याची नामिबियाला संधी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →