२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २८ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान नायजेरियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा नायजेरिया क्रिकेट संघटनेने भरविली होती. यजमान नायजेरियासह गांबिया, घाना, सियेरा लिओन आणि रवांडा पाच देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. पैकी गांबिया आणि घाना या दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. योजनेनुसार कामेरूनचा संघसुद्धा स्पर्धेत सहभाग घेणार होता परंतु नंतर त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.
स्पर्धा गट फेरीनुसार खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. सर्व सामने लागोस मधील तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. गट फेरीतून यजमान नायजेरिया आणि रवांडा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या नायजेरियाला ५३ धावांनी पराभव करत रवांडाने चषक जिंकला. तर सियेरा लिओनने तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफ सामन्यात घानाला १० गडी राखून पराभूत करत तिसरे स्थान पटकावले.
२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रित ट्वेंटी२० चषक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.