२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ९-१८ जून २०२२ दरम्यान ऱ्वांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही आठवी आवृत्ती होती. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदानावर खेळविण्यात आले.

मूलत: नियोजनानुसार एकूण अकरा देश स्पर्धेत सहभाग घेणार होते. त्यामुळे क्विबुका स्पर्धेची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढली जाणार होती आणि प्रथमत:च जर्मनी आणि ब्राझिलच्या रूपाने आफ्रिका खंडाबाहेरील देशांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु नंतर घाना, सियेरा लिओन आणि झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतली, त्यामुळे एकूण आठ देशांनी सरतेशेवटी भाग घेतला.

गट फेरीचे सर्वच्या सर्व सात सामने जिंकत टांझानियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पाठोपाठ केन्यानेसुद्धा १२ गुणांसह अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात केन्याचा ४४ धावांनी पराभव करत टांझानियाने स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →