सियेरा लिओन क्रिकेट संघाने सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान नायजेरियाचा दौरा केला. या दोन्ही संघांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये रवांडात होणाऱ्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी सदर मालिका आयोजीत केली गेली. सियेरा लिओन संघाने त्यांचे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लागोस मधील लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.
नायजेरियाने मालिका ५-१ ने जिंकली.
सियेरा लिओन क्रिकेट संघाचा नायजेरिया दौरा, २०२१-२२
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.