२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका ही युगांडामध्ये १० ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान युगांडासह केन्या आणि नायजेरिया या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिरंगी मालिकेआधी युगांडा आणि केन्या यांनी तीन ५० षटकांचे सामने खेळले ज्यात युगांडाने २-१ ने विजय मिळवला.
प्रथमत: स्पर्धा एकूण १३ सामन्यांची खेळवली जाणार होती ज्यात प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी ४ सामने खेळणार होता. त्यानंतर गुणफलकातील अव्वल दोन संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार होती. परंतु नंतर असे ठरविण्यात आले की प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी फक्त तीन सामने खेळेल आणि मग अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. तिरंगी मालिकेतील सर्व सामने एंतेब्बे मधील एंटेबी क्रिकेट ओव्हलवर खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यात केन्याचा ६ धावांनी पराभव करत यजमान युगांडाने तिरंगी मालिका जिंकली.
२०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका
या विषयावर तज्ञ बना.