२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका (अधिकृत नाव २०२१-२२ कॅप्रीकॉन महिला तिरंगी मालिका) ही महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका २० ते २६ एप्रिल २०२२ दरम्यान नामिबियामध्ये झाली. यजमान नामिबियासह युगांडा आणि झिम्बाब्वे या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. विन्डहोक मधील ट्रान्स नामिब मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले.
प्रत्येक संघाने इतर संघांबरोबर प्रत्येकी तीन सामने खेळले. गुणफलकातील अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळतील. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाने झिम्बाब्वेवर ७ गडी राखून विजय मिळवला. नामिबियाने प्रथमच एका संपूर्ण सदस्य देशाला पराभूत केले. झिम्बाब्वेने १० गुणांसह अव्वल स्थानावर राहत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. नामिबियाने ८ गुणांसह द्वितीय स्थानावर राहत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. युगांडाला एकही सामना जिंकता आला नाही. नॉमवेलो सिबंदाच्या हॅट्रीक आणि पाच बळींच्या जोरावर अंतिम सामन्यामध्ये नामिबियाचा डाव ७० धावांवर संपुष्टात आला. झिम्बाब्वेने ७१ धावांचे लक्ष्य १० षटकांच्या आतच गाठले व तिरंगी मालिका जिंकली.
२०२१-२२ नामिबिया महिला तिरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.