नामिबिया क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. हा नामिबियाचा पहिला झिम्बाब्वे दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. सर्व सामने बुलावायो मधील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले.
झिम्बाब्वेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. नामिबियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. पुन्हा झिम्बाब्वेने तिसरा सामना जिंकून आघाडी घेतली. ४थ्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत नामिबियाने विजय मिळवून मालिका २-२ अश्या स्थितीत आणून ठेवली. मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक लढतीत नामिबियाने झिम्बाब्वेला ३२ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक मालिकाविजय मिळवला. नामिबियाने पहिल्यांदाच कसोटी देशाला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केले.
नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.