युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२

युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक मधील युनायटेड क्रिकेट मैदानावर झाले. युगांडाने यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये नामिबियाचा दौरा केला होता ज्यात नामिबियाने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली होती. अनौपचारिक एकदिवसीय सामने नामिबिया अ संघाविरुद्ध झाले.

नामिबियाने पहिला सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात कर्णधार गेरहार्ड इरास्मुसने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर १७७ धावांपर्यंत मजल मारली. परंतु युगांडन फलंदाज दिनेश नाकराणीने केलेल्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर अनपेक्षितरित्या युगांडाने दुसरा ट्वेंटी२० सामना ७ गडी राखून जिंकत मालिका १़-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवला. मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवत नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात नामिबियन गोलंदाज जेजे स्मिट याने हॅट्रीक घेतली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हॅट्रीक घेणारा तो नामिबियाचा पहिला खेळाडू ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →