२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान मलेशियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धेत एकूण पाच देशांनी भाग घेतला. विजेता संघ २०२२ राष्ट्रकुल खेळासाठी पात्र ठरला.
नोव्हेंबर २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया जाहीर केली. इंग्लंड आपोआप यजमान म्हणून पात्र ठरले आणि १ एप्रिल २०२१ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रमवारीमधील सहा सर्वोच्च संघ इंग्लंडला सामील झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेद्वारे अंतिम स्थान निश्चित केले जाईल. सर्व सामने क्वालालंपूर मधील किन्रर अकॅडेमी ओव्हल या मैदानावर झाले.
श्रीलंका संघाने सर्व ४ सामन्यात विजय मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
२०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.