जुलै-ऑगस्ट २०२२ दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेंतर्गत एक क्रिकेट स्पर्धा खेळवली गेली. सदर स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली गेली. १९९८ नंतर प्रथमच राष्ट्रकुल खेळात क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने राष्ट्रकुल खेळात क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रकुल समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव पारित झाल्याने महिला क्रिकेटचा २०२२ च्या खेळात समावेश करण्यात आला. बर्मिंगहॅम मधील एजबॅस्टन मैदानावर सर्व सामने खेळविण्यात येणार असल्याची घोषणा आयसीसीतर्फे करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसीने स्पर्धेच्या पात्रतेचा ढाचा जाहीर केला.
१ एप्रिल २०२१ रोजी आयसीसी महिला ट्वेंटी२० क्रमवारीतील अव्वल ६ संघ आणि यजमान देश इंग्लंड स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरले. वेस्ट इंडीजच्या कोट्यातून बार्बाडोस पात्र ठरला तर उर्वरीत एक जागेसाठी मलेशियात झालेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका पात्र ठरला.
२०२२ राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.