२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २४-२६ जून २०२१ दरम्यान बल्गेरियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा बल्गेरिया क्रिकेट फेडरेशनच्या स्थापनेस २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भरविण्यात आली होती. सर्व सामने सोफिया मधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीावर खेळविण्यात आले. यजमान बल्गेरियासह रोमेनिया, सर्बिया आणि ग्रीस या चार देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धा प्रथम गट पद्धतीने खेळवली गेली. सर्व संघांनी विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. गट फेरीचे सामने झाल्यावर गुणफलकातील अंतिम क्रमवारीनुसार उपांत्य सामने झाले. रोमेनिया ने सर्व गट सामने जिंकत पहिले स्थान पटकावले. रोमेनियाने चौथ्या स्थानावर असलेल्या सर्बियाला उपांत्य सामन्यात १० गडी राखत अंतिम सामना गाठला. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाची तिसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रीसबरोबरची उपांत्य सामन्याची लढत पावसाचा व्यत्यत आल्याने रद्द करण्यात आली. गट फेरीत दुसऱ्या स्थानी राहिल्यामुळे बल्गेरिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. अंतिम सामन्यात रोमेनियाने बल्गेरियाचा ७ गडी राखून पराभत करत सोफिया ट्वेंटी२० चषक जिंकला. तरणजीत सिंग याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोमेनियाच्याच रमेश सथीसन याने स्पर्धेत सर्वाधिक १९७ धावा केल्या तर समी उल्लाह आणि पॅवेल फ्लोरिन ह्या जोडीने प्रत्येकी ७ बळी मिळवत स्पर्धेत आघाडीचे गोलंदाज ठरले.
२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
या विषयावर तज्ञ बना.