२०२१ खंडीय चषक (क्रिकेट)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २-५ सप्टेंबर २०२१ दरम्यान रोमेनियामध्ये आयोजित केली गेली होती. मागील स्पर्धेचे विजेते ऑस्ट्रिया संघाने या आवृत्तीत भाग घेतला नाही. सामने इल्फो काउंटी मधील मोआरा व्लासी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले. यजमान रोमेनियासह बल्गेरिया, लक्झेंबर्ग, माल्टा, चेक प्रजासत्ताक आणि हंगेरी या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. हंगेरीने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.

सर्व ६ संघांना दोन गटामध्ये विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरले. अ गटातून लक्झेंबर्ग, माल्टा तर ब गटातून रोमेनिया आणि हंगेरी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात रोमेनियाने लक्झेंबर्गचा ३३ धावांनी पराभव करत चषक जिंकला तसेच तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नवख्या हंगेरीने अनुभवी माल्टावर ८ गडी राखून आश्चर्यकारक विजय मिळवला आणि तिसरे स्थान पटकावले. जे दोन संघ उपांत्य फेरीत पात्र होऊ शकले नाहीत म्हणजेच बल्गेरिया आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये पाचवे स्थान निश्चित करण्यासाठी एक सामना झाला ज्यात चेक प्रजासत्ताकने बल्गेरियाला ७ गडी राखून हरवले आणि पाचवे स्थान पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →