२०२१ मध्य युरोप चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा आहे २१ ते २३ मे २०२१ दरम्यान चेक प्रजासत्ताक देशातील प्राग येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताकसह ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्ग या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. माल्टा क्रिकेट संघ सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार होता परंतु ६ मे रोजी आलेल्या बातमीनुसार वाढत्या कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे माल्टा संघाने या स्पर्धेतून माघार घेतली. सर्व सामने प्राग मधील विनॉर क्रिकेट स्टेडियमवर खेळविले गेले.
ही स्पर्धा मध्य युरोप चषकातली ७वी स्पर्धा आहे आणि सन २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी (आयसीसी) सर्व सदस्य देशांमधील खेळवल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा बहाल केला. त्यामुळे ही या वर्षीची स्पर्धा अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असलेली पहिली स्पर्धा आहे. इसवी सन २०२० मध्येच या स्पर्धेला अधिकृत ट्वेंटी२० दर्जा दिला गेला होता परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे सन २०२० च्या स्पर्धेची आवृत्ती रद्द करण्यात आली होती.
ऑस्ट्रियाने ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थानावर राहत मध्य युरोप चषक या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकला.
२०२१ मध्य युरोप चषक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.