२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २६-३० ऑगस्ट २०२१ दरम्यान स्पेनमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या युरोप भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण सहा देशांनी यात भाग घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेचे आयोजन स्कॉटलंड मध्ये होणार होते परंतु तिथे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे स्पर्धा स्पेनला स्थलांतरित केली गेली. फ्रान्स आणि तुर्कस्तान या दोन देशांनी आयसीसी स्पर्धांमध्ये पदार्पण केले. परंतु स्पर्धा सुरू होण्याच्या आधी तुर्की क्रीडा मंत्रालयाकडून कोरोनाव्हायरसमुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी नाकारली गेल्यामुळे ऐनवेळी तुर्कस्तानने स्पर्धेतून माघार घेतली.

स्पर्धा गट फेरी प्रकारात खेळवली गेली. सर्व संघांनी इतर प्रतिस्पर्धी संघांबरोबर एक सामना खेळला. गट फेरीचे सामने संपल्यानंतर. विजेता संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला. सर्व ४ सामन्यांमध्ये अपराजित राहत स्कॉटलंड पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरला. आश्चर्य म्हणजे आयसीसीचा संपूर्ण सदस्य असलेला आयर्लंडला पुढील टप्पा गाठण्यास अपयश आले. आयर्लंड अजूनही महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत उच्च स्थानावर असलेल्या गैर-पात्र संघासाठी उपलब्ध असलेल्या स्थानाद्वारे पुढे जाऊ शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →