२०२१ जर्मनी तिरंगी मालिका

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०२१ जर्मनी तिरंगी मालिका ही जर्मनीत झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटि२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान जर्मनीसह फ्रान्स आणि नॉर्वे ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नियोजनानुसार ही स्पर्धा मे २०२१ दरम्यान होणार होती, परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा ऑगस्ट मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. या तीन देशांबरोबरच स्पेन देखील या स्पर्धेत सहभाग घेणार होता. पण कोरोनाव्हायरसमुळे स्पेन ने माघार घेतली.

१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच जर्मनी मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी आणि अंतिम सामना या प्रकाराने खेळवली गेली.

अंतिम सामन्यात नॉर्वेचा ६ गडी राखून पराभव करत जर्मनीने तिरंगी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →