फ्रान्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान जर्मनीचा दौरा केला. जर्मनीमध्ये प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी आणि फ्रान्सच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमधली ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. ऑगस्ट २०२१ मध्ये होणाऱ्या युरोप ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेच्या स्पर्धेसाठी सराव व्हावा यासाठी ही मालिका आयोजित केली गेली. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन येथे खेळविण्यात आले.
जर्मन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.
फ्रान्स महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२१
थोडक्यात पण महत्त्वाचे.