२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा २४ जून ते २३ जुलै, २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविली गेली. ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची ११वी आवृत्ती होती., आणि इंग्लंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती (ह्या आधी १९७३ आणि १९९३ मध्ये ही स्पर्धा खेळविली गेली होती. ही पहिलीच स्पर्धा अशी होती की ज्यामध्ये सर्व व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले होते. लॉर्ड्सवर २३ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेसाठी आठ संघ पात्रता स्पर्धा खेळून पात्र ठरले. हे संघ दोन गटांत विभागले गेले असून ते एकमेकांशी साखळी सामने खेळले. दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत गेले.
या स्पर्धेतील १० सामन्यांत डीआरएस वापरण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये डीआरएसचा हा पहिला वापर होता.
२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.