आयर्लंड त्रिकोणी मालिका, २०१७

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली. जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वतयारी म्हणून सदर मालिकेचे आयोजन केले गेले. क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. एकदिवसीय मालिकेआधी, आयर्लंड संघ दोन सराव सामने खेळला; बांगलादेशविरुद्ध ५०-षटकांचा आणि न्यू झीलंड विरुद्ध २५-षटकांचा.

मालिकेआधी, एप्रिल २०१७ मध्ये, बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझावर श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एका सामन्याची बंदी लादण्यात आली.

पाचव्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १९० धावांनी पराभूत करून न्यू झीलंडने मालिकेत विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →