नोव्हेंबर २०१६ मध्ये झिम्बाब्वेमध्ये झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ ह्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यजमान झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्टइंडीजच्या संघांदरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली. मूलतः श्रीलंकेचा दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामन्यासाठी झिम्बाब्वे दौरा नियोजित होता. परंतू, एकदिवसीय आणि टी-२० या मालिकांऐवजी त्रिकोणी मालिका आयोजित करण्यात आली होती.
झिम्बाब्वेमधील मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पहिल्यांदाचा डीआरएस तंत्रज्ञान वापरले गेले. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमधील दुसऱ्या कसोटीनंतर लगेच ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सदर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.
श्रीलंकेने अंतिम सामन्यात झिम्बाब्वेला ६ गडी राखून हरवले आणि स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.