श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७

थोडक्यात पण महत्त्वाचे.

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७

श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान झिम्बाब्वे दौरा केला. सुरुवातीला जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक टी२० सामना खेळवला जाणार होता. ऑगस्ट २०१६, मध्ये जाहीर केले गेले की ह्या दौऱ्याऐवजी झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज दरम्यान त्रिकोणी मालिका खेळवली जावू शकते. सप्टेंबर २०१६ मध्ये जाहीर केले गेले की मर्यादित षटकांच्या सामन्यांऐवजी त्रिकोणी मालिका खेळविली जाईल आणि श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेमध्ये फक्त दोन कसोटी सामने खेळेल.

उभय संघांदरम्यान याआधी २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता. मालिकेतील पहिली कसोटी ही झिम्बाब्वेची १०० वी कसोटी आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डीआरएस पद्धत वापरली गेली. झिम्बाब्वेमध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले गेले, याआधी जास्त किंमतीमुळे ही पद्धत वापरात नव्हती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →