श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दौऱ्यावर तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले. सुरुवातीला वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्थानिक टी२० स्पर्धा - रॅम स्लॅम टी२० - साठी तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला.

१२ डिसेंबर २०१६ रोजी ए.बी. डी व्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेचे कसोटी कर्णधारपद सोडले. त्याने त्याच्या ऐवजी फाफ डू प्लेसीचे नाव सुचवले, आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) त्यास मान्यता दिली. मालिकेच्या आधी, डू प्लेसीला नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान चेंडू फेरफार प्रकरणी दोषी करार दिले गेले. त्याने त्याबाबत अपील केले, पण ते नाकारण्यात आले. त्याचे दुसऱ्या कसोटीचे मानधन कापून घेण्यात आले, परंतु एका-सामन्याच्या बंदीच्या कठोर शिक्षेपासून तो बचावला. डी व्हिलियर्स संघात परतला आणि त्याला एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. तो तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात सुद्धा खेळला, ज्यात नेतृत्व फरहान बेहार्डीनने केले होते.

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-० ने जिंकली. टी२० मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील आपला पहिला मालिका विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेमध्ये ५-० असे निर्भेळ यश संपादन करून आयसीसी एकदिवसीय चँपियनशीपमध्ये पहिले स्थान मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →