श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८

श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी२० सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला. ह्यामध्ये मिसबाह-उल-हकच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांने पहिल्यांदाच कर्णधार असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा समावेश होता.

२७ सप्टेंबर २०१७ रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी पंचांची निवड केली. दुसरा कसोटी सामना दिवसा / रात्र खेळवला गेला, तो श्रीलंकेसाठी पहिलाच दिवस / रात्र कसोटी सामना होता. श्रीलंकेने कसोटी मालिका २–० ने जिंकली. पाकिस्तानचा हा ऑक्टोबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३-० व्हाईटवॉश नंत पाकिस्तानचा हा घरच्या मालिकेतील दुसरा तर संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलाच व्हाईटवॉश. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली. एकाच वर्षात तीन एकदिवसीय मालिकांमध्ये ५-० असा व्हाईटवॉश मिळणारा श्रीलंका हा पहिलाच संघ. ह्या आधी त्यांना जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तर ऑगस्टमध्ये भारताकडून व्हाईटवॉश मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →