पाकिस्तान संघ सध्या मार्च २०१७ ते मे २०१७ दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. सदर दौऱ्यावर ३-कसोटी, ३-एकदिवसीय आणि ४-टी२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात आल्या. ऑगस्ट २०१६ मध्ये भारताविरुद्ध खेळल्याप्रमाणे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क येथे आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्याची शक्यता पडताळून पाहिली होती. परंतु त्यांनी या दौऱ्यावरील सर्व सामने कॅरेबियनमध्येच खेळले गेले.
जानेवारी २०१७ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडीज बोर्डासमोर दोन टी२० सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला. हे सामने १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी लाहोर येथे आणि आणखी दोन टी२० सामने फ्लोरिडा येथे खेळवण्याबाबत विचार केला गेला. परंतु १२ जानेवारी २०१७, रोजी सामने जाहीर केले गेले, तेव्हा त्यात कुठेही पाकिस्तानातील सामन्यांचा उल्लेख नव्हता. त्यादिवशीच नंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीजचा संघ सुरक्षिततेच्या कारणामुळे पाकिस्तानात खेळणार नसल्याचे जाहीर केले. आधी कार्यक्रमानुसार दोन टी२० सामने खेळवण्याचे ठरले होते, परंतु मार्च २०१७ च्या सुरुवातीला वेळापत्रकात आणळी दोन टी२० सामन्यांचा समावेश करण्यात आला.
दौऱ्याआधी, मिसबाह-उल-हकने पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार होण्याचा निर्णय घेतला आणि तो पाकिस्तान बोर्डाने मान्य केला. एप्रिल २०१७ मध्ये, मिसबाहने ह्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. दोन दिवसानंतर, युनिस खाननेसुद्धा मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-१ अशी जिंकली आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला. त्या नंतर त्यांनी कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला २-१ ने पराभूत करून, वेस्ट इंडीजमधील पहिला मालिका विजय साकारला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७
या विषयावर तज्ञ बना.