पाकिस्तान क्रिकेट संघाने सध्या तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ब्रिस्बेनच्या द गब्बावरील १ली कसोटी गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळवण्यात आली. १ल्या कसोटीची पुर्वतयारी म्हणून पाकिस्तानची कियाद-ए-आझम ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शील्ड २०१६-१७ मोसमाची पहिली फेरी दिवस/रात्र सामन्यांची खेळवली गेली..
हा पाकिस्तानचा १७वा ऑस्ट्रेलिया दौरा होता, ह्या आधी २००९-१०च्या मोसमात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर पाकिस्तानला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये व्हाईटवॉश मिळाला होता तसेच एकमेव टी२० सामन्यात सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ह्याआधी दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१४-१५च्या मोसमात आमनेसामने आले होते, त्यावेळी पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली परंतु ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. ह्या आधीच्या दोन मालिका गमावून ऑस्ट्रेलियाचा संघ ह्या कसोटी मालिकेत उतरला होता – श्रीलंकेविरुद्ध परदेशी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी. ते ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये उतरतील ते, श्रीलंकेविरुद्धचा ४-१ अशा एकदिवसीय मालिका विजय, आयर्लंडविरुद्ध ९ गडी राखून विजय आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परदेशातील ५-० मालिका पराभव – एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये पराभूत झाला. परंतु ह्या मालिकेच्या अगदी आधी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन, चॅपेल-हॅडली चषक पुन्हा मिळवला.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी खिशात घातली. त्यांचा तिसऱ्या कसोटीमधील विजय हा त्यांचा पाकिस्तानविरुद्ध सलग १२ वा कसोटी विजय होता. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेमध्ये ४-१ असा विजय मिळवला
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!