चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला. ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या. बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ. ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
या विषयातील रहस्ये उलगडा.