झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते. जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली. हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय. २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय. त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय. झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय "माझ्या कारकिर्दीचा कळस" असल्याची भावना व्यक्त केली. त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे " आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

श्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →