दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर होता. जानेवारी २०१७ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार ए.बी. डी व्हिलियर्सने मालिकेच्या निवडीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. चवथा एकदिवसीय सामना आधी मॅकलीन पार्क, नेपियर येथे खेळवला जाणार होता, जो नंतर सेडन पार्क, हॅमिल्टन येथे हलवण्यात आला. नेपियर येथे मैदानाचा गवताळ पृष्ठभाग, निचरा आणि सिंचन व्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सदर बदल करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेने एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला तर पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात घालून, एकदिवसीय क्रमवारीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला. हा दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजय. ह्या विजयासह त्यांनी न्यू झीलंडची मायदेशातील सलग आठ द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजयाची शृंखला खंडीत केली. पहिली आणि शेवटची कसोटी अनिर्णित राहिलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवून, कसोटी क्रमवारीमध्ये भारतामागोमाग दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?