२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका ही महिला क्रिकेट मालिका ४ ते २१ मे २०१७ दरम्यान पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका येथे खेळवली गेली. सदर मालिका भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांदरम्यान खेळवली गेली. मालिकेतील सामने सेन्वास पार्क आणि द पुक ओव्हल येथे खेळवले गेले. महिला एकदिवसीय दर्जा नसलेल्या झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या सामन्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट म्हणून खेळवण्यात आले.
मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हान निकेर्कला पायाला झालेल्या दुखापतीमुळे वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने अंतरिम कर्णधाराची निवड केली, परंतु संघात नव्या खेळाडूला निवडले गेले नाही.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभूत करून मालिकेचे विजेतेपद मिळविले.
२०१७ दक्षिण आफ्रिका चौरंगी मालिका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.