२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज ही स्पर्धा दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर येथे १४ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान पार पडलेली आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धा आहे. एकूण आठ असोसिएट सदस्य संघ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा नसलेला नामिबियाचा संघ सहभागी झाला. त्यामुळे निमिबीया खेळत असलेले सर्व सामने ट्वेंटी२० सामने म्हणून खेळवले गेले.

स्पर्धेचे वेळापत्रक अमिरात क्रिकेट बोर्डाने (ECB) डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर केले. आठ संघ दोन गटांमध्ये विभागण्यात आले. उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने २० जानेवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पार पडले.

अ गटातून अफगाणिस्तान आणि आयर्लंड तर ब गटातून स्कॉटलंड आणि ओमान अंतिम फेरीसाठी पात्र झाले. अंतिम सामन्यान अफगाणिस्तानने आयर्लंडचा १० गडी राखून दणदणीत पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →