२०१५-१७ सालांतली आयसीसी आंतरखंडीय चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसीने) संस्थेच्या प्रमुख सहभागी सदस्य देशांदरम्यान भरवलेल्या आंतरराष्ट्रीय प्रथम वर्गीय क्रिकेट स्पर्धेची सातवी फेरी आहे. ही फेरी २०१७सालापर्यंत चालणार आहे. या २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेत नेहमीपेक्षा जरा वेगळे संघ आहेत. आयर्लंडचा आणि अफगाणिस्तानचा संघ हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेतलेल्या पात्रता प्रक्रिया रँकिंगमध्ये पात्र ठरले आहेत. मात्र देशांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी केन्या आणि नेपाळ हे देश वगळले आहेत. मात्र ते चार-दिवसीय सामन्यांत खेळू शकतील.
जानेवारी २०१४ मध्ये आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संरचनेत केलेल्या बदलाचा एक परिणाम म्हणून, २०१५-१७ आंतरखंडीय चषक (आणि स्पर्धेच्या पुढील आवृत्त्यांचा) विजेता संघ कसोटी क्रमवारीमधील तळाच्या संघांशी चार पाच-दिवसीय सामने खेळेल (दोन मायदेशी आणि दोन परदेशी), जी स्पर्धा २०१८ आयसीसी कसोटी चॅलेंज म्हणून ओळखली जाईल. आंतरखंडीय चषक विजेते राष्ट्र जर आयसीसी कसोटी चॅलेंज स्पर्धासुद्धा जिंकले तर ते राष्ट्र ११वे कसोटी राष्ट्र होईल.
२०१५-१७ आयसीसी आंतरखंडीय चषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.