अमिनी पार्क

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अमिनी पार्क हे पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी स्थित क्रिकेट मैदान आहे. बोरोकोच्या उपनगरातील बिसिनी परेड क्रीडा संकुलाचा भाग असलेले हे मैदान म्हणजे क्रिकेट पापुआ न्यू गिनीचे मुख्यालय आहे.

पापुआ न्यू गिनीच्या पुरुष आणि महिला संघात खेळलेल्या अमिनी कुटुंबाच्या अनेक सदस्यांच्या नावावरून मैदानाला नाव देण्यात आले.

ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि व्हिक्टोरिया पुरुष संघ तर जपानचा महिला क्रिकेट संघ ह्या मैदानावर खेळला आहे.

मे २०१६ मध्ये, २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान ह्या मैदानावर पहिला लिस्ट अ सामना खेळवला गेला, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी संघाने केन्या संघाला ६ गडी राखून पराभूत केले. ऑक्टोबर २०१६ मध्ये मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळवला गेला. ह्या सामन्यामध्ये २०१५-१७ आयसीसी इंटरकॉंटिनेन्टल चषकाच्या ह्या सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाने नामिबिया संघाला पराभूत केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →