२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही इंग्लंड आणि वेल्स येथे १ ते १८ जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. सदर स्पर्धेची हे ८वी आवृत्ती आहे. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील.

अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेशचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. २००६ च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →