श्रीलंकेमध्ये १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान पार पडेलली चवथी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वेस्ट इंडीजने जिंकली. आशिया खंडातील ही पहिलीच टी२० विश्वचषक स्पर्धा, या आधीच्या तीन स्पर्धा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये झाल्या होत्या. श्रीलंकेचा तेजगती गोलंदाज लसिथ मलिंगा ह्याला आयसीसीतर्फे या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यात आले. स्पर्धेच्या स्परूपानुसार प्राथमिक फेरीत प्रत्येकी तीन देशांचे चार गट होते. भारत आणि इंग्लंडच्या 'अ' गटात आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, अफगाणिस्तान होता. पात्रता फेरीतील विजेता संघ आयर्लंड, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या 'ब' गटात होता. 'क' गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे, तर 'ड' गटात पाकिस्तान, न्यू झीलंड आणि बांगलादेशचा समावेश होता.
सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने २१ सप्टेंबर २०११ रोजी जाहीर केले. आणि त्याच दिवशी त्यांनी स्पर्धेचा लोगो "मॉडर्न स्पिन"चे सुद्धा अनावरण केले.
२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२०
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!