२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५ च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले.

२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.

स्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसऱ्या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.

भारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →