२००६ आयसीसी चॅम्पियन्स चषक

या विषयातील रहस्ये उलगडा.

२००६ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २००६ दरम्यान भारतात खेळवली गेलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आयसीसी चॅम्पियन्स चषकाची ही पाचवी आवृत्ती होती (पूर्वी स्पर्धेला आय.सी.सी. नॉक-आऊट असे संबोधले जात असे). २००५ च्या मध्यापर्यंत स्पर्धेची ठिकाणी ठरवली गेली नव्हती कारण तोपर्यंत भारतीय सरकारने स्पर्धेला करातून सूट दिली नव्हती. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला गट फेरीत हरवले परंतु अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजला अवघ्या १३८ धावांवर सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजा सलामीवीर क्रिस गेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सदर स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी १० पैकी ५ सांघिक धावसंख्या नोंदवल्या गेल्या. एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या ८ स्थानांवरील संघांचा समावेश असलेल्या सामन्यांत ८० (वेस्ट इंडीज, श्रीलंकेविरूद्ध) आणि ८९ (पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध) ह्या सर्वात निचांकी धावांची नोंद झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →