क्रिकेट विश्वचषक, १९९९

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

१९९९चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडने आयोजित केला होता. इंग्लंडशिवाय आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्येही सामने झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरला.. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. एकतर्फी झालेली ही अंतिम लढत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झाली. न्यू झीलँड व दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोचले.

या स्पर्धेत १२ देशांना भाग देण्यात आला. हे प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत खेळले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघाशी एकदा खेळला. यानंतर प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन संघांना सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळाला. तेथे प्रत्येक संघ विरुद्ध गटातील संघांशी एकएकदा खेळला. पहिल्या फेरीतील आपल्या गटातील संघांविरुद्धचे गुण या फेरीत वापरले गेले. या सहा संघांपैकी सर्वोच्च् चार संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. त्यातील विजयी संघ अंतिम फेरी खेळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →