१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१२ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. ऑगस्ट, २०१२ मध्ये खेळविल्या गेलेल्या या क्रीडासत्रात १९ वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता.

ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड राज्यातील ब्रिस्बेन, सनशाईन कोस्ट आणि टाऊन्सव्हिल या शहरांमध्ये क्रिकेट सामने खेळविले गेले. अंतिम सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला . भारताचा कर्णधार उन्मुक्त चंद याने १३० चेंडूंमध्ये नाबाद १११ धावा फडकाविल्या, त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार विल्यम बेसिस्टोला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →