१६ संघाचा सहभाग असलेला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील नववा विश्वचषक होता. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. १५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान खेळविल्या गेलेल्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील १६ संघाचा सहभाग होता ज्यामध्ये १० कसोटी क्रिकेट खेळणारे संघ, यजमान म्हणून संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ आणि ५ अतिरिक्त सहकारी व संलग्न पात्र ठरलेल्या देशांच्या संघांचा (अफगाणिस्तान, कॅनडा, नामिबीया, पापुआ न्यू गिनी व स्कॉटलंड) समावेश होता.
१ मार्च २०१५ रोजी खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकाने पाकिस्तानवरती ६ गडी राखून विजय मिळवीत पहिल्यांदाच १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. गतविजेत्या भारतीय संघाला ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.