क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये २०१९ क्रिकेट विश्वचषक मध्ये सामिल होणारे अंतिम २ संघ ठरवले गेले. ह्या स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज हे दोन अव्वल संघ २०१९ क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले आणि यजमान (इंग्लंड) व एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धातून विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरलेल्या ७ संघांना सामील होतील. अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अफगाणिस्तानाचा मोहम्मद शहजाद सामनावीर तर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला.

योजनेप्रमाणे ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होणार होती. पण मे २०१७ मध्ये ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याचे ठरले कारण बांग्लादेश विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरला. त्यानुसार ह्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशांनी बोली लावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आय.सी.सी) ने ऑक्टोबर २०१७ मध्ये स्पर्धेचे यजमानपद झिम्बाब्वेकडे सुपुर्द केले. जानेवारी २०१८ मध्ये आयसीसीने सामन्यांचे वेळापत्रक व स्थळांची नावे जाहीर केली. स्पर्धेच्या समारोपानंतर, नेदरलँड्स आणि या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या ३ संलग्न सदस्य संघांना २०२२ पर्यंत एकदिवसीय दर्जा देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →