२०१९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली गेलेली एक क्रिकेट स्पर्धा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली, ह्या स्पर्धेतुन अव्वल ६ संघ २०२० साली ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाकरता पात्र ठरले.
जानेवारी २०१९ पासून आयसीसीने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा बहाल केला. त्यामुळे प्रादेशिक पात्रता आणि जागतिक पात्रतेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० असेल.
जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही. पुढील महिन्यातच आयसीसीने स्पर्धेत झिम्बाब्वेऐवजी नायजेरिया खेळेल असे स्पष्ट केले. नायजेरिया आफ्रिका प्रादेशिक पात्रतेत ३ऱ्या स्थानावर होता.
२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?