२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा आहे. उप प्रादेशिक स्पर्धा जून आणि जुलै २०२१ मध्ये फिनलंड आणि बेल्जियममध्ये होणार होत्या तर प्रादेशिक अंतिम फेरी ऑक्टोबर २०२१ मध्ये स्पेनमध्ये होणार होती. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले गेले.

कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा अनेकवेळा पुढे ढकलाव्या लागल्यानंतर सरतेशेवटी मे २०२१ मध्ये आयसीसीने उप प्रादेशिक फेऱ्या रद्द केल्या. उपप्रादेशिक पात्रता रद्द केल्याचा परिणाम म्हणून ३० एप्रिल २०२० पर्यंत आयसीसी पुरुषांच्या ट्वेंटी२० संघ क्रमवारीत आपापल्या गटातील संघांपैकी अव्वल स्थानी असल्यामुळे इटली, जर्मनी आणि डेन्मार्क अनुक्रमे गट अ, ब आणि क मधून पात्र ठरले, जर्सी आधीच २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर प्रादेशिक अंतिम फेरीत पोचला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →