१९९३-९४ हिरो चषक ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ७ ते २७ नोव्हेंबर १९९३ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सदर स्पर्धा भरवली गेली. यजमान भारतसह, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या पाच देशांचे क्रिकेट संघ सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा पराभव करून हिरो चषकावर आपले नाव कोरले. भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९३-९४ हिरो चषक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.