१९८९-९० नेहरू चषक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९८९-९० नेहरू चषक (किंवा प्रायोजकांनुसार १९८९-९० एम.आर.एफ विश्व मालिका - जवाहरलाल नेहरू चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १५ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९८९ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. स्वतंत्र भारतीय संघराज्याचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या भारतात क्रिकेटचे व्यवस्थापन करण्याऱ्या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली. सदर स्पर्धा मद्रास रबर फॅक्ट्रीने प्रायोजीत केली होती.

या स्पर्धेत यजमान भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आणि वेस्ट इंडीज या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. सर्व देशांना एकाच गटात ठेवण्यात आले. प्रत्येक संघाने इतर संघाशी एक सामना खेळला. गट फेरीतून अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले.

पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर ६ गडी राखून मात केली आणि अंतिम सामन्यास पात्र ठरले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान भारताला ८ गडी राखून हरवत अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवत नेहरू चषक जिंकला. पाकिस्तानच्या इम्रान खानला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या डेसमंड हेन्स हा स्पर्धेतील सर्वाधिक ३६६ धावा करत आघाडीचा फलंदाज ठरला तर वेस्ट इंडीजचाच विन्स्टन बेंजामिन याने स्पर्धेत सर्वाधिक १३ गडी मिळवत आघाडीचा गोलंदाज ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →