१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. ही स्पर्धा १७ फेब्रुवारी ते १० मार्च १९८५ दरम्यान ऑस्ट्रेलियात झाली.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात युरोपीय वसाहत स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. तत्कालिन सर्व कसोटी देश (तेव्हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कार असल्याने दक्षिण आफ्रिका वगळता) उर्वरीत सात संपूर्ण सदस्य देश : यजमान ऑस्ट्रेलियासह, न्यू झीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेतील सामने हे मेलबर्न क्रिकेट मैदान आणि सिडनी क्रिकेट मैदान या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना प्रकाशझोतात खेळविण्यात आला. सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके) ह्या पद्धतीने खेळले गेले.
१० मार्च १९८५ रोजी मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ गडी राखत पराभव करत ही एकमेव स्पर्धा जिंकली. यानंतर पुन्हा ही स्पर्धा भरविण्यात आली नाही. भारताच्या रवि शास्त्रीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताच्याच कृष्णम्माचारी श्रीकांत याने सर्वाधिक २३८ धावा केल्या तर लक्ष्मण शिवरामकृष्णन याने सर्वाधिक १० गडी बाद केले.
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.